
मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील चेंबूर परिसरात गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी भर रस्त्यात एका बिल्डरवर गोळ्या झाडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या गोळीबारात सदर व्यक्ती जखमी झाली असून, तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटना चेंबूरच्या मैत्रीपार्क भागातील आहे. प्राथमिक माहितीनुसार, गोळीबार झालेला व्यक्ती नवी मुंबईतील बिल्डर असून त्यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
गोळीबाराची ही घटना गोवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली असून, चेंबूरच्या डायमंड गार्डन सिग्नलजवळ ५० वर्षीय सद्रुद्दीन खान यांच्यावर गोळी झाडण्यात आली. हे सायन-पनवेल महामार्गावरून पनवेलकडे जात असताना ही घटना घडली.