
नवी मुंबई प्रतिनिधी
एप्रिल मे दरम्यान हापूस आंब्याची आवक होत असते यंदा मात्र अवकाळीच तडाका बसल्याने हापूस आंबा ग्राहकांना मिळेल की नाही अशी साक्षमता असतानाच
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याच्या पेट्यांची अक्षरशः बंपर आवक झाली आहे. तब्बल एक लाख हापूस आंब्याच्या पेट्या आज बाजारात दाखल झाल्यामुळे आंब्याच्या दरांमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. नवी मुंबईच्या बाजारात आलेल्या 80 हजार पेट्या थेट कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागातून आल्या आहेत. तर उर्वरित 20 हजार पेट्या कर्नाटक आणि केरळ राज्यांसारख्या परराज्यातून दाखल झाल्या आहेत. परराज्यातील हापूस सध्या 60 ते 120 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे.