
सातारा प्रतिनिधि न्युज नेटवर्क.
सातारा- लोकशाहीचे राज्य आणण्यासाठी विधानसभा निवडणूक अपक्ष लढणार.कोरेगाव तालुक्याला दिशा देण्यासाठी माझी उमेदवारी राहणार आहे.असे सातारारोड येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुधाकर फाळके इनामदार पत्रकार परिषदेत बोलत होते.
मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे विचार अत्यंत चांगले आहेत. मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ती चळवळ योग्य आहे. त्यांच्या चळवळीत मी पहिल्या दिवसापासून सहभागी आहे.
विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत त्यांच्याशी चर्चा झाली नाही. मात्र, भविष्यकाळात मराठा आरक्षणाबद्दल जो काही निर्णय होईल, तो चळवळीतला एक कार्यकर्ता या नात्याने मान्य करून निवडणूक लढवली जाईल, असेही फाळके इनामदार यांनी स्पष्ट केले.
कोरेगाव तालुक्यात आजवरच्या राजकीय नेतृत्वाने सर्वसामान्य जनतेवर अन्याय करण्याची भूमिका घेतली आहे. या अन्यायाखाली जनता पिचली असून सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी माझी उमेदवारी आहे, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.