
उमेश गायगवळे
वांद्रे पूर्व मतदार संघाचे आमदार वरून सरदेसाई यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच झाले.
वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहत येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे (ठाकरे) गटाचे आमदार वरून सरदेसाई यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उद्धव ठाकरे, वरून सरदेसाई यांच्या मातोश्री यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. त्या उद्घाटन प्रसंगी आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, आ.अनिल परब, आ.मिलिंद नार्वेकर माजी नगरसेवक राजू भुतकर, अनिल त्रिंबक सर, शाखाप्रमुख अरूण कांबळे, बबन साळवी, शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच गौतम सेवा संघाचे सिद्धार्थ मोहिते, विजय साळवी, राकेश धिल्लोड, अनिल भोसले, एकनाथ गाडे, दीपक हाटे स्थानिक रहिवासी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी उद्धव ठाकरे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या ते पुढे म्हणाले की वांद्रे पूर्व हा आपला इलाका आहे काम ही दणक्यात झालं पाहिजे, लोकांनी आशीर्वाद दिला आहे, आशीर्वाद हेच बळ आहे. गौतम नगर वसाहतीतली लोक शुभेच्छा द्यायला आले आहेत. त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाता कामा नये लोकांची कामे केली पाहिजेत, आणि ती होणारच, आता गुडी कुठे उभी करायची ते तुम्हाला माहित आहे. असेही ते म्हणाले,
वरून देसाई म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे आभार मानून मला काम करण्याची संधी दिली आणि आपण सर्व या प्रसंगी उपस्थित राहिलात त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
ते म्हणाले की या मतदार संघाला चार चार आमदार आहेत. त्यामुळे विकास निधी काही कमी पडणार नाही. गेल्या शंभर दिवसांमध्ये आमदार आपल्या दारी या उपक्रमातून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे.
लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला आहे लोकांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला
मी तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही देसाई यांनी दिली.
या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गौतम सेवा संघातील रहिवासी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.