
मुंबई प्रतिनिधी
मुंबई – महिला रेल्वे पोलिस अधिकार्यावर लैंगिक अत्याचार करून खंडणीची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुख्य आरोपीने पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 20 लाख रुपयांची खंडणी मागितली.
या प्रकरणी नेहरू नगर पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मुख्य आरोपीने पीडितेशी लग्न केले होते. मात्र, 2021 ते जानेवारी 2025 या कालावधीत त्याने वारंवार तिच्यावर अत्याचार केला. मुलुंड, अंधेरी, कल्याण, चेंबूर आणि लोणावळा यासह विविध ठिकाणी पीडितेवर अत्याचार करण्यात आला. यावेळी आरोपीने पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यांचा गैरवापर करून त्याने 10 लाख रुपयांची खंडणी मागितली.
या कटात आरोपीचा मित्रही सहभागी होता. तसेच, आरोपीचे आधीच लग्न झाले असल्याचे उघडकीस आले. आरोपीच्या पत्नीनेही पीडितेकडून 10 लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. आरोपीच्या आईने पीडितेला शिवीगाळ केली.
पीडितेच्या तक्रारीवरून नेहरू नगर पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याचा मित्र, पत्नी आणि आई यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.