
नागपूर प्रतिनिधी
नागपूर हिंसाचारात प्रमुख आरोपी असलेला मास्टर माईंड फहीम खान याचा घरावरील कारवाईबाबत मोठी बातमी समोर आली आहे. नागपूर दंगलीचा कथित मास्टर माईंड फईम खान यांच्या घरावर मनपाकडू बुलडोझर कारवाई करण्यात येत आहे.
फहीम खान याच्या नागपूरच्या (Nagpur Violence) टेकानाका परिसरातील घर बांधतांना काही भागात अतिक्रमण केलंय. नागपूर महानगर पालिकेने त्याच्या कुटुंबाला या संदर्भात नोटीस बजावल्यानंतर आता प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर महानगर पालिकेचे पथक फहीम खानच्या घरी पोहचले असून तोडकाम करण्याच्या कारवाईला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. दरम्यान या आधीच फहीम खानच्या परिवाराने रात्री घर रिकामे केलं असल्याचे दिसून आले आहे. तर हे घर फहिम खानच्या आईच्या नावाने असल्याची माहिती पुढे आली आहे. EWS अंतर्गत NITने 30 वर्षाच्या लीजवर खानच्या परिवाराला जागा दिल्याची माहितीही तपासात पुढे आली आहे. मनपाच्या या कारवाईच्या पार्श्वभूमीवर यशोधरा नगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात स्थानिक पोलीस, एसआरपीएफच्या दोन तुकड्या परिसरात तैनात करण्यात आल्या आहे.