
मुंबई प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी पुण्यातील स्वारगेट बस स्थानक परिसरात एका प्रवासी तरुणीवर शिवशाही बसमध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. घडलेल्या या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता.
यावेळी आरोपी दत्ता गाडे याने पीडितेशी जवळीक साधली. तिला ताई म्हणत विश्वास संपादन केला. आणि तिला बस स्थानकावर उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये घेऊन जात अत्याचार केला.
पुण्यातील सर्वाधिक गजबजलेल्या बस स्थानकावर अशाप्रकारे अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर एसटी प्रशासनावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या प्रकरणी आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरणात हयगय केल्याप्रकरणी एसटी प्रशासनाच्या आठ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात, त्यात प्रादेशिक व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रक यांचाही समावेश आहे.