पुणे प्रतिनिधी
पीएमआरडीच्या अपर जिल्हाधिकारी स्नेहल बर्गे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात्य बहीण आणि आई असा परिवार आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या स्नेहल बर्गे यांनी हवेली तालुक्याच्या प्रांतधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं.
अवैध गौणखजिना उत्खनन, वाहतूक यावर त्यांनी कठोर कारवाई केली होती. स्नेहल यांच्या बहीण पल्लवी बर्गे या देखील पोलिस अधिक्षक पदी कार्यरत आहेत.
स्नेहल बर्गे या प्रांतधिकारी म्हणून कार्यरत असताना बड्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण गाजले होते. स्नेहल यांनी त्यावेळी या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. धडाकेबाज अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती, त्यामुळे त्या चर्चेत अधिक होत्या त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.


