
मुंबई प्रतिनिधी
बृहन्मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील अनाधिकृत बांधकामांच्या संदर्भात चौकशी करण्यासाठी माजी न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाईल. या समितीच्या अहवालानुसार, जे शासकीय अधिकारी यात दोषी आढळतील, अशा अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
विधानपरिषद सदस्य सर्वश्री सचिन अहिर, ॲड.अनिल परब, भाई जगताप, प्रवीण दरेकर, सुनील शिंदे यांनी मुंबईतील अनधिकृत बांधकामासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.
उद्योगमंत्री सामंत म्हणाले की, सध्या आठ प्रभागांमध्ये ७,९५१ अनधिकृत बांधकामे आहेत, ज्यामध्ये १,२११ बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत. याशिवाय, २,०१५ बांधकामांसंदर्भात खटले चालू आहेत. अनधिकृत बांधकामांच्या संदर्भात शासन गांभीर्याने विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.