
मुंबई प्रतिनिधी
दिनांक 15/03/2025 रोजी शिवडी पोलीस ठाणे हद्दीत निर्भया पथक पेट्रोलिंग करत असताना, दक्षिण नियंत्रण कक्षाकडून 12:54 वाजता संदेश प्राप्त झाला की, शिवडी चांदणी चौक रे रोड ए शेड गोडाऊन येथे एका गरोदर महिलेला तात्काळ मदतीची आवश्यकता आहे.
संदेश मिळताच निर्भया पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तेथे MH 01 AT 1424 क्रमांकाच्या बंद टॅक्सीमध्ये सदर महिला प्रसूतीच्या अवस्थेत असल्याचे आढळले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, शिवडी 05 मोबाईल निर्भया पथकाने 108 रुग्णवाहिकेची मदत मागवली. तत्परतेने आलेल्या MH 14 CL 0607 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून, डॉक्टर सुलतान यांच्या मदतीने सदर महिलेला सर जे. जे. रुग्णालय, मुंबई येथे दाखल करण्यात आले.
रुग्णालयात दाखल केल्यानंतरही तिच्या नातेवाईकांचा कोणताही संपर्क झाला नाही. त्यामुळे पोलिसांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून महिलेला संपूर्ण मदत प्रदान केली. प्रसूतीदरम्यान तिने आरोग्यदायी मुलाला जन्म दिला असून, सध्या आई आणि बाळ सुखरूप आहेत.
या उल्लेखनीय कार्यगिरीबद्दल शिवडी पोलीस ठाण्याच्या निर्भया पथकाला पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) श्री. सत्यनारायण चौधरी यांनी बक्षीस देऊन सन्मानित केले.
या मदत कार्यात योगदान दिलेले अधिकारी:
निर्भया अधिकारी: पो. उ. नि. साकोरे
निर्भया वाहनावरील पोलीस अधिकारी: ASI पठाण, मपोशि 140477 चव्हाण, मपोशि 28 खारवाल
मदतीसाठी सहकार्य: मपोशि 03443 सुर्वे, मपोशि 41 शेंडे
ही कामगिरी पोलीस दलाच्या तात्काळ प्रतिसाद आणि सेवाभावाची जाणीव करून देते.