
मुंबई प्रतिनिधी
मुंबई स्वच्छ-सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांवर नजर ठेवून दंडात्मक कारवाई करण्यासाठी पालिकेने नेमलेल्या ‘क्लीन-अप मार्शल’कडून मांडवली करून पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी वाढत असल्यामुळे मुंबईतून ‘क्लीन-अप मार्शल’ हद्दपार केले जाणार आहेत.
क्लीन-अप मार्शल नेमलेल्या कंत्राटदाराची मुदत मेमध्ये संपणार असून हे कॉण्ट्रक रद्द करून नवा पर्याय शोधला जाणार आहे.
मुंबईत तीन वर्षांपूर्वी ‘क्लीन-अप मार्शल’ पुरवणाऱ्या संस्थेच्या कंत्राटाची मुदत संपल्याने सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात कारवाई थांबली होती, मात्र 2 एप्रिल 2024 पासून पुन्हा ही कारवाई सुरू झाली. महापालिकेच्या आयटी विभागाने ऑनलाइन अॅपद्वारे दंडात्मक रक्कम वसूल करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
यासाठी क्लीन-अप मार्शलकडे मोबाईल ब्ल्यूटूथवर चालणारा छोटा प्रिंटर देण्यात आला आहे. या प्रिंटरद्वारे दंडाकरिता स्वतंत्र पावती छापून दिली जात आहे. दंडाची अर्धी रक्कम पालिका तर अर्धी रक्कम कंत्राटदाराला मिळत आहे. हा दंड टाळण्यासाठी मुंबईकरांनी स्वच्छता राखावी, असे आवाहन पालिका प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. दरम्यान, पालिकेच्या 24 वॉर्डमध्ये सुमारे एक हजार क्लीन-अप मार्शल आहेत.
आतापर्यंतपाच कोटींचादंडवसूल
वॉर्डमध्ये क्लीन-अप मार्शलकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईनुसार 1 लाख 68 हजार 505 जणांविरोधात चलान कापून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल 4 कोटी 84 लाख 06212 इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
हेकरूनका, अन्यथादंडात्मककारवाई
उघडय़ावर इतरत्र कचरा टाकणे – 200 रुपये
सार्वजनिक ठिकाणी उघडय़ावर थुंकणे – 200 रुपये
उघडय़ावर स्नान करणे – 100 रुपये
दुकानाबाहेर कचऱ्याचा डबा न ठेवणे – 500 रुपये
कचरा विलगीकरण न करणे – 500 रुपये
प्राणी व पक्ष्यांना उघडय़ावर खाऊ टाकणे – 500 रुपये
धोकादायक कचरा निर्देशित न करणे – 500 रुपये.