
मुंबई प्रतिनिधी
पवई येथील हिरानंदानी परिसरातील एका हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून वेश्या व्यवसायात सहभागी असलेल्या 4 नवोदित अभिनेत्रींची सुटका केली आहे. तरुणींना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या श्याम सुंदर अरोरा या 60 वर्षीय दलालाला देखील पोलिसांनी अटक केली आहे
या चारही तरुणींना देवनार येथील महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
चारही तरुणी टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या
पवई येथे देहव्यापार करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तोतया ग्राहकांद्वारे पोलिसांनी सापळा रचून पर्दाफाश केला होता. चारही तरुणी टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री व मॉडेलिंग करणाऱ्या आहेत. पोलिसांनी त्यांच्या तावडीतून चार तरुणींची सुटका केली आहे. त्या तरुणी 26 ते 35 वर्ष वयोगटातील आहेत. पोलिसांनी या कारवाई दरम्यान हॉटेलच्या खोल्यांमधून 8 महागडे मोबाईल, रोख रक्कम जप्त केली आहे. चार महिलांच्या चौकशीत अरोरा ग्राहकांकडून मिळणाऱ्या पैशांपैकी 50 टक्के रक्कम स्वतः घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी पवई पोलिस अधिक तपास करत आहेत.