
मुंबई प्रतिनिधी
खार पोलीस ठाणे हद्दीत हरवलेला मोबाईल 24 तासात परत मिळवून देण्यात खार पोलिसांना यश मिळाले आहे. नितीन तांबे यांचा मोबाईल गहाळ झाला होता. त्यांनी तक्रार खार पोलिस ठाण्यात केली असता तात्काळ कारवाई करत खार पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्ता कोकणे आणि त्यांच्या टीमने 24 तासात फोन मिळवून दिल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.