
पत्रकार उमेश गायगवळे
मुंबई, ठाणे, नवी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी बसमध्ये मोबाईल चोरणाऱ्या 5 जणांच्या टोळीला जे जे मार्ग पोलिसांनी अटक करून 53 मोबाईल हस्तगत केले आहेत.
एक मार्च 2025 रोजी तक्रारदर संदेश भुजबळ हा भायखळाहून भेंडी बाजार जंक्शन पायधुनी, मुंबई येथे बसणे प्रवास करत असताना खिशातील मोबाईल चोरीला गेला. त्यांनी जे जे मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी सततच्या मोबाईल चोरीच्या घटनांची दखल घेत, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत नेरकर आणि त्यांच्या पथकाने सात ते आठ दिवस गोवंडी ते कुलाबा बसने प्रवास करून साध्या वेशात पाळक ठेवली. अखेर 11 मार्च रोजी गोंडी बैंगनवाडी येथे बस मध्ये चढत असताना गुन्हेगार आरोपींना अटक केली.
१)अब्दुल कयूम अन्सार उर्फ दरभंगा व 59, २) हसन मोहम्मद हुसेन शेख उर्फ विटी 58, ३) मोहम्मद वकील इदुहाक शेख 34, ४) अलेक्झांडर अन्वर शेख वय 34, ५) मोहम्मद शहीद मुक्तार शेख वय 32, या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे या आरोपींनी ठाणे नवी मुंबई जेजे मार्ग पोलीस ठाणे आदि ठिकाणाहून बस मधून प्रवास करणाऱ्यांचे मोबाईल चोरी केले होते.
ही कारवाई पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे, पोलीस आयुक्त तन्वीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय काटे पोलीस निरीक्षक गुन्हे मुकुंद वाघमोडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत नेरकर गुन्हे पोलीस कॉन्स्टेबल नियाजुद्दीन तडवी, सचिन पाटील, मंदार घाडगे, प्रवीण शेवरे, दीपक डावरे, ब्रह्मदेव कोळपुसे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.