
मुंबई प्रतिनिधी
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने 100 आणि 200 मूल्याच्या नोटा जारी करणार असल्याची घोषणा केली आहे. श्री संजय मल्होत्रा यांनी याबाबत माहिती दिली आहे. नवीन RBI गव्हर्नरच्या नियुक्तीनंतर या नोटा बाजारात आणणे ही एक नियमित प्रक्रिया आहे.
या नोटांवर महात्मा गांधी यांचाच फोटो असणार आहे. लवकरच महात्मा गांधी (नवीन) मालिकेतील 100 आणि 200 मूल्याच्या नोटा जारी करणार आहेत. ज्यांवर नवनियुक्त गव्हर्नर श्री संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी आहे. या नवीन नोटांची रचना अपरिवर्तित राहील आणि ती महात्मा गांधी (नवीन) मालिकेतील विद्यमान 100 आणि 200 च्या नोटांसारखीच असेल. यांच्या डिझाइनमध्ये कोणताही बदल होणार नाही, मात्र या नवीन नोटांवर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असेल, अशी माहिती आरबीआयने दिली आहे. दरम्यान, मध्यवर्ती बँकेने असेही पुष्टी केली आहे की, पूर्वीच्या सर्व 100 आणि 200 मूल्याच्या नोटा चलनात राहणार आहे.
चलनात असलेल्या जुन्या नोटांच्या वैधतेवर कोणताही परिणाम होणार नाही.
नवीन आरबीआय गव्हर्नरच्या नियुक्तीनंतर नोटा जारी करणे ही एक नियमित प्रक्रिया आहे. गेल्या वर्षी डिसेंबर 2024 मध्ये संजय मल्होत्रा यांची शक्तीकांत दास यांच्या जागी आरबीआयचे 26 वे गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली आहे. रिझर्व्ह बँक वेळोवेळी विद्यमान गव्हर्नरच्या अद्ययावत स्वाक्षरीसह नवीन चलनी नोटा जारी करते, ज्यामुळे चलन व्यवस्थेत सातत्य सुनिश्चित होते. नवीन नोटा लवकरच चलनात आणल्या जातील.