
मुंबई प्रतिनिधी
तिन चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या होळी सणानिमित्त एसटी महामंडळही प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. कोकणात जाणाऱया चाकरमान्यांच्या सोयीसाठी महामंडळाने मुंबई, ठाण्यातून 195 जादा एसटी गाडय़ांची व्यवस्था केली आहे.
सोमवारपासून या गाड्या धावण्यास सुरुवात झाली असून 17 मार्चपर्यंत जादा गाड्या प्रवाशी सेवेत राहणार आहेत. महामंडळाकडून ग्रुप-95 आणि आरक्षण-97 अशा एकूण 195 जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या गाड्या मुंबई, ठाणे, पालघर जिह्यांतून कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यात जाणार आहेत. गुहागर, चिपळूण, खेड, कणकवली, रत्नागिरी, गणपतीपुळे या भागांत जादा एसटी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांची मागणी वाढल्यास आणखी गाडय़ा उपलब्ध करून दिल्या जातील, असे एसटी महामंडळाने जाहीर केले आहे.