
मुंबई प्रतिनिधी
पुण्याच्या स्वारगेट येथे महिलेवर झालेल्या बलात्काराची घटना ताजी असतानाच आता मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका बारा वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं समोर आलं आहे.
मुलीला एकटं बघून हे नराधम मुलीला त्यांच्या संजय नगर जोगेश्वरी येथील घरी घेऊन गेले आणि त्यानंतर या नराधमांनी मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला. या प्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून आरोपी एसी मेकॅनिक असल्याची माहिती समोर आली आहे.
दादर स्थानकात सोडलं?
अल्पवयीन मुलगी दादर रेल्वे स्थानकात भटकत असताना पोलिसांनी संशय आला त्यांनी तिची विचारपूस केली. त्यावेळी तिने सामुहिक बलात्कार झाल्याचं सांगितले. पोलिसांनी तिला तत्काळ जोगेश्वरी पोलिसांशी संपर्क केला असता मुलीचे अपहरण झालं असल्याची तक्रार आल्याचं त्यांनी सांगितलं.
पाचही नराधमांना अटक
मुलीच्या जबाबानंतर गुन्ह्यात सामूहिक बलात्कार आणि बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पॉक्स) कायदा अंतर्गत कलमाची वाढ करून पाचही नराधमांना अटक करण्यात आली . अटक आरोपींचे नाव जमाल, आफ्ताब, महफुझ, हसन, जाफर असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.