
मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल सुभाष कांगणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. ते तिन महिन्यापूर्वी मालवणी पोलीस ठाण्यातून बदली होऊन आले होते.
पोलिसांनी अद्याप आत्महत्येचे कारण स्पष्ट केले नसले तरी प्राथमिक तपासात वैयक्तिक कारणे असू शकतात असं सूचित केलं आहे कर्तव्याशी संबंधित ताण तणाव कौटुंबिक समस्या किंवा इतर वैयक्तिक आव्हानामुळे हे दुर्दैवी पाऊल उचलले जाऊ शकते असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
सुभाष कांगणे यांच्या आत्महत्या सखोल चौकशी केली जाणार असून एक सुसाईड नोट मिळाली असल्याचेपोलिसांनी सांगितलं आहे. कांगणे यांच्या आत्महत्या नंतर उपायुक्त स्मिता पाटील, वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली असून तपास सुरू केला आहे.