
नागठाणे प्रतिनिधी
घरी अठरा विश्व दारिद्र्य, आणि पोलीस होण्याची उराशी बाळगलेलं स्वप्न पाहणाऱ्या अति दुर्गम भागातील अनिता अखेर पोलीस भरतीत यश मिळालं आहे.
यंदा पोलिस भरतीत ती यशस्वी ठरली. पोलिस दलात दाखल होणारी दुर्गम भागातील ती पहिली महिला आहे.
दारिद्र्याने वेढलेल्या, दुर्गम खेड्यात राहिलेल्या अनिता लक्ष्मण ढेबे हिची ही प्रेरणादायी कहाणी.
वडील पूर्णत: अशिक्षित. गावातील प्राथमिक शाळेत तिचे प्राथमिक शिक्षण, माध्यमिक अन् महाविद्यालयीन शिक्षण तळदेवच्या इलाबेन मेहता विद्यालयात झाले. मग पोलिस भरतीसाठी तिने प्रयत्न सुरू केले. गेल्या वर्षी पुण्यातील पोलिस भरतीत अगदी थोड्या गुणांनी यशाला हुलकावणी दिली.
मात्र, निराश, नाउमेद न होता अनिताचे प्रयत्न सुरूच राहिले. त्यातून यंदा पोलिस भरतीत ती यशस्वी ठरली. पोलिस दलात दाखल होणारी दुर्गम भागातील ती पहिली महिला आहे.
संघर्षाचा प्रवास
अनिताचा सारा प्रवास हा जिद्द अन् संघर्षाचा राहिला आहे. अभ्यासाच्या सोयीसुविधांची अभाव, घरच्या बिकट परिस्थितीमुळे तिला महाबळेश्वरमध्ये कपड्यांच्या दुकानातही काम करावे लागले अनेक छोटी मोठी कामे करत राहिली आणि अखेर पोलीस भरतीचे स्वप्न केलं पूर्ण झालं.