
मुंबई -आज मुंबईतील छत्रपती शिवाजी मंदिर, दादर येथे संपन्न झालेल्या स्वाभिमानी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या उत्कर्षासाठी राज्यातील नागरी व सामाजिक संघटना, विचारवंत, साहित्यिक, कलावंत आणि कार्यकर्त्यांचा सक्रीय सहभाग असलेल्या ‘राज्यव्यापी वज्र निर्धार परिषदे’त पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी संवाद साधला.
महाराष्ट्रधर्म रक्षणासाठी जो कुणी माझ्यासोबत येईल, तो प्रत्येकजण माझा आहे त्या प्रत्येकाला सोबत घेऊन महाराष्ट्र उत्कर्ष साधणारच असा निर्धार ह्यावेळी उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी केलं.
ह्यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, तुषार गांधी, उल्का महाजन, उपनेते विनोद घोसाळकर, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, सचिव डॉ. संजय लाखे-पाटील, सचिव पराग डाके तसेच इतर पदाधिकारी-शिवसैनिक आणि विविध संघटनांचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.