
पत्रकार:उमेश गायगवळे
सीआयडी युनिट 10 च्या पथकाने साकीनाका पोलिसांच्या समन्वयाने अंधेरी साकीनाका येथील युनिट क्रमांक ६०२/७२ क्रार्प बिल्डिंग हे सुरू असलेल्या बेकायदेशीर कॉल सेंटरवर छापा टाकून विदेशी नागरिकांना लक्ष करून फसवा कार्या कारवायांमध्ये सहभागी असलेल्या सहा जणांना अटक करण्यात आले आहे आरोपीकडून या कारवाईत हार्ड ड्राईव्ह दोन मोबाईल फोन एक पेन ड्राईव्ह अनेक संबंधित कागदपत्र जप्त करण्यात आली आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना ताब्यात घेतले आहे.
१)असंम मोहम्मद सलीम सय्यद 32 मालक , २) जैद एहसान शेख 31 -व्यवस्थापक, ३)ओवैस एहसान शेख, टेली कॉलर, ४) तोफिक वसीम शेख टेली कॉलर,५) अदान अहमद शेख 21- टेली कॉलर,६) रेहान या या खान 18 – टेली कॉलर या सर्व आरोपींना अटक केली असून पोलिसांनी न्यायालयात सादर केले आहे न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे ही कारवाई पी आय कांबळे यांना मिळालेल्या माहितीनुसार पीआय राजे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने एपीआय चौधरी, तोडकर, आणि इतर दोन स्वतंत्र साक्षीदारांसह छापा टाकला होता.