
पत्रकार:उमेश गायगवळे
मुंबई पोलिसांच्या झोन 6 अंतर्गत येणाऱ्या देवनार शिवाजीनगर, मानखुर्द, गोवंडी, पोलीस ठाण्याच्या हद्दीत राबवलेल्या ड्रग्स मुक्त मुंबई मोहिमेचा एक भाग म्हणून ड्रग्स तस्करीवर मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत 94. 494 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रानुसार देवनार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजू मालुंखे आणि पोलीस कॉन्स्टेबल संतोष कांबळे यांना देवनार पोलीस हद्दीत ड्रग्स विक्रीसाठी गांजा साठवत असल्याची गोपनीय माहिती मिळाली या माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला त्यामध्ये 10,04,400 रुपयांचा 50,220 किलो गांजा जप्त करण्यात आला आरोपी महिला शबाना शेले आलम शाह उर्फ शची(32) असून तिला अटक करण्यात आली आहे त्याचबरोबर दुसरी मोठी कारवाई नऊ लाख 748 रुपये किमतीचा 44.274 किलो गांजा जप्त केला आहे.
त्याची किंमत 19.78 428 रुपये आहे ही पोलीस उपायुक्त नवनाथ धवते, सहाय्यक आणि संयुक्त बाबुराव सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बसिद अली यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पीआय विजयकुमार आंब्रे, एपीआय कैलास सोनवणे, पीएसआय राजू साळुंखे, पीएसआय अभिजीत देशमुख, कॉन्स्टेबल संतोष कांबळे, हवालदार आंग्रे, तेजस देशमुख, विशाल पाटील, सोनवणे, सूर्यवंशी, प्रियंका माने, ज्ञानी पवार, आणि मयुरी पाटील या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.