पुणे प्रतिनिधी
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दीर्घकाळ उल्लेखनीय, निष्कलंक आणि गुणवत्तापूर्ण सेवा बजावणाऱ्या पोलिस अधिकारी व अंमलदारांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील तब्बल ३७ अधिकारी व अंमलदारांची राष्ट्रपती पदकांसह विविध सेवा पदकांसाठी निवड झाली आहे. यामध्ये एकाला राष्ट्रपती पदक, तर अतिउत्कृष्ट सेवा, उत्कृष्ट सेवा आणि विशेष सेवा पदकांनी अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
शिवानंद स्वामी यांना राष्ट्रपती पदक
गुणवत्तापूर्ण आणि उल्लेखनीय सेवेसाठी श्रेणी पोलिस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. दीर्घकाळ प्रामाणिकपणे आणि उल्लेखनीय पद्धतीने बजावलेल्या सेवेची दखल घेत त्यांना हा बहुमान मिळाला आहे.
अतिउत्कृष्ट सेवा पदक
अतिउत्कृष्ट सेवा पदकासाठी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, सपोआ विठ्ठल कुंबडे, पोलिस निरीक्षक नितीन गिते, अनिल विभुते, अरविंद पवार, गोरखनाथ कुंभार, पोलिस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी, सपोफौ नागेश माळी, राजेंद्र शिंदे, सुनील कानगुडे, राजू जाधव, आदिनाथ मिसाळ तसेच पोलिस हवालदार रामदास बारटक्के यांचा समावेश आहे.
उत्कृष्ट सेवेसाठी १५ जणांचा गौरव
उत्कृष्ट सेवा पदकासाठी पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर, पोलिस निरीक्षक विनोद पाटील, सुहास आवाड, रविकिरण नाळे, सचिन शिर्के, सपोनि सचिन घाटे, सपोफौ दिपक महाजन, राजेंद्र कोनेरी, पोलिस हवालदार विवेक जगदाळे, अनिल साळुंखे, अमोल निघोट, संतोष शिंदे, आशिष बोटके, तसेच मपोशि कामिनी पवळे आणि नुतन जाधरी यांचा सन्मान करण्यात आला.
विशेष सेवा पदकासाठी १५ जणांची निवड
विशेष सेवा पदकासाठी पोलिस निरीक्षक तेजस्विनी कदम, पोलिस उपनिरीक्षक सागर देवकर, महेश सातपुते, गणेश आठवे, दत्तात्रय सुकाळे, श्रीकांत गुरव, महादेव भालेराव, आबा कटपाळे, प्रकाश पारखे, राहुल दुधमल, लक्ष्मण मोगले, अनिल टाफे, चंद्रशेखर मोरखंडे, राजेंद्र पानसरे आणि चिरंजीव दलालवाड यांची निवड झाली आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने पदक प्रदान समारंभ
पदकप्राप्त अधिकारी व अंमलदारांचा १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील शिवनेरी हॉल येथे आयोजित समारंभात गौरव करण्यात आला. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले.
यावेळी पोलिस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अपर पोलिस आयुक्त (प्रादेशिक विभाग) डॉ. बसवराज तेली, तसेच सर्व पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त आणि पदकप्राप्त अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळच्या गुणवत्तापूर्ण सेवेची दखल घेत मिळालेला हा सन्मान पोलिस दलासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. या पदकांमुळे कर्तव्यनिष्ठ आणि उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार्याला विशेष सन्मान मिळाला असून, पोलिस दलातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही त्यातून प्रेरणा मिळणार आहे.

