
सातारा प्रतिनिधी न्यु नेटवरक
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रविवारी आयसीसी १९ वर्षांखालील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकणाऱ्या मुलींच्या संघाला ५ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. मलेशिया येथे झालेल्या मध्ये भारतीय संघाने जेतेपद कायम राखले.
२०२३ मध्ये भारताने जेतेपद पटकावले होते आणि आज निकी प्रसादच्या नेतृत्वाखाली त्यांनी जेतेपद राखण्यात यश मिळवले. BCCI ने भारतीय महिला संघाचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या अंतिम सामन्यात आफ्रिकेला ८२ धावांवर गुंडाळले व सोपे लक्ष्य स्वीकारले. ८३ धावांचे लक्ष्य भारताने अवघ्या ११.२ षटकांत गाठले आणि ९ विकेट्सने फायनल जिंकली. १९ वर्षांखालील महिलांचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप सलग दुसऱ्यांदा भारताने जिंकला आहे.
निकी प्रसादच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला. भारताने संपूर्ण स्पर्धेत निर्भयपणे खेळ केला आणि अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेवर नऊ विकेट्स राखून विजय मिळवला. बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक नूशीन अल खदीर यांच्या मार्गदर्शनाखालील विजयी संघ आणि सपोर्ट स्टाफसाठी ५ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.
या स्पर्धेत भारताच्या जी. त्रिशाने सर्वाधिक ३०९ धावा केल्या आणि तिने सात विकेट्स घेतल्यामुळे तिला सामनावीर आणि टूर्नामेंटची सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. फिरकीपटू वैष्णवी शर्मा आणि आयुषी शुक्ला यांनी अनुक्रमे १७ आणि १४ विकेट विकेट्स घेतल्या. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी सांगितले की, “आमच्या मुलींचे विश्वचषक राखल्याबद्दल अभिनंदन. त्यांचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. ही ट्रॉफी भारतातील महिला क्रिकेटमधील प्रगती दर्शवतेय. मी पुन्हा एकदा संपूर्ण संघ, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचे अभिनंदन करू इच्छितो,
सीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले की, भारतीय संघाच्या अतुलनीय कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. मलेशियामध्ये आयसीसी महिला १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या विजेतेपदाचा यशस्वीपणे रक्षण केल्याबद्दल महिला संघाचे मनःपूर्वक अभिनंदन करतो असे ते म्हणाले.