मुंबई प्रतिनिधी
भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्रात १५ ऑगस्ट रोजी विविध जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहणाचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडणार आहेत. राज्य सरकारने जिल्हा मुख्यालयांवरील शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवरांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात यंदा नेमके कोणाच्या हस्ते तिरंगा फडकविला जाणार, याची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे.
राज्याचा मुख्य शासकीय स्वातंत्र्य दिन सोहळा मुंबईतील मंत्रालयात होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी ८.०५ वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे. पुण्यात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर राज्यातील जिल्हा मुख्यालयांवर विविध मंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या हस्ते ध्वजारोहण केले जाणार आहे.
रायगडमध्ये भरत गोगावले, नाशिकमध्ये गिरीश महाजन
शासनाच्या यादीप्रमाणे रायगड जिल्ह्यात मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते, तर नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. ठाणे येथे एकनाथ शिंदे, बीडमध्ये सुनैत्रा पवार, नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, अहिल्यानगरमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील आणि नंदुरबारमध्ये हसन मुश्रीफ ध्वजारोहण करणार आहेत.
सांगलीत चंद्रकांत पाटील, पालघरमध्ये गणेश नाईक, जळगावमध्ये गुलाबराव पाटील, अमरावतीत दादाजी भुसे, यवतमाळमध्ये संजय राठोड, रत्नागिरीत उदय सामंत आणि धुळ्यात जयकुमार रावल यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
जालना येथे पंकजा मुंडे, नांदेडमध्ये अतुल सावे, चंद्रपूरमध्ये डॉ. अशोक बुडके, साताऱ्यात शंभूराज देसाई, तर मुंबई उपनगरात आशिष शेलार यांच्या हस्ते तिरंगा फडकविला जाणार आहे.
वाशिममध्ये दत्तात्रय भरणे, लातूरमध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले, सोलापूरमध्ये जयकुमार गोरे, हिंगोलीमध्ये नरहरी झिरवाळ, छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट आणि धाराशिवमध्ये प्रताप सरनाईक ध्वजारोहण करतील.
बुलढाण्यात मकरंद जाधव (पाटील), सिंधुदुर्गमध्ये नितेश राणे, अकोल्यात आकाश फुंडकर, कोल्हापुरात प्रकाश आबिटकर, गडचिरोलीत आशिष जयस्वाल, भंडाऱ्यात माधुरी मिसाळ, वर्ध्यात डॉ. पंकज भोयर, परभणीत मेघना बोर्डीकर आणि गोंदियात इंद्रनील नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
जिल्हानिहाय ध्वजारोहण करणारे मान्यवर
जिल्हा – ध्वजारोहण करणारे मान्यवर
ठाणे – एकनाथ शिंदे
बीड – सुनैत्रा पवार
नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे-पाटील
नंदुरबार – हसन मुश्रीफ
सांगली – चंद्रकांत पाटील
नाशिक – गिरीश महाजन
पालघर – गणेश नाईक
जळगाव – गुलाबराव पाटील
अमरावती – दादाजी भुसे
यवतमाळ – संजय राठोड
रत्नागिरी – उदय सामंत
धुळे – जयकुमार रावल
जालना – पंकजा मुंडे
नांदेड – अतुल सावे
चंद्रपूर – डॉ. अशोक बुडके
सातारा – शंभूराज देसाई
मुंबई उपनगर – आशिष शेलार
वाशिम – दत्तात्रय भरणे
लातूर – शिवेंद्रसिंहराजे भोसले
सोलापूर – जयकुमार गोरे
हिंगोली – नरहरी झिरवाळ
छत्रपती संभाजीनगर – संजय शिरसाट
धाराशिव – प्रताप सरनाईक
रायगड – भरत गोगावले
बुलढाणा – मकरंद जाधव (पाटील)
सिंधुदुर्ग – नितेश राणे
अकोला – आकाश फुंडकर
कोल्हापूर – प्रकाश आबिटकर
गडचिरोली – आशिष जयस्वाल
भंडारा – माधुरी मिसाळ
वर्धा – डॉ. पंकज भोयर
परभणी – मेघना बोर्डीकर
गोंदिया – इंद्रनील नाईक
राज्यात स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून ध्वजारोहण कार्यक्रमांची तयारी सुरू झाली आहे. जिल्हा मुख्यालयांवर शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, पोलिस दल, विद्यार्थी आणि नागरिकांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. तिरंग्याला मानवंदना देत देशभक्तीपर वातावरणात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

