
मुंबई प्रतिनिधी
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या दि. ३१ जानेवारी रोजी झालेल्या द्वैवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी दैनिक ‘पुढारी’चे दिलीप सपाटे तर सरचिटणीसपदी दैनिक ‘लोकमत’ चे दीपक भातुसे निवडून आले आहेत.
यावेळी दिलीप सपाटे १२४ मते मिळवत अध्यक्षपदी निवडून आले आहेत.
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सर्वसाधारण वार्षिक सभेत सन २०२५ -२६ आणि २०२६- २७ अशा दोन वर्षासाठी संघाची कार्यकारिणी निवडण्यात आली. या निवडणुकीत कोषाध्यक्षपदी विनोद यादव ( दिव्य भास्कर), उपाध्यक्षपदी आलोक देशपांडे ( इंडियन एक्स्प्रेस) निवडून आले. तर कार्यकारिणी सदस्य म्हणून मनोज दुबे ( हमारा महानगर )सुजित महामुलकर ( हिंदुस्थान पोस्ट) , खंडूराज गायकवाड ( सांज महानगरी ), प्रशांत बारसिंग( नवराष्ट्र ) आणि राजन शेलार ( पुढारी) विजयी झाले आहेत.
मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ निवडणूक निकाल
एकूण मतदार १८०
झालेले मतदान १६८ (९३ टक्के)
अध्यक्ष (१ जागा)
१. दिलीप सपाटे : १२४ (विजयी)
२. दिलीप जाधव : ३७ (पराभूत)
नोटा: ७
उपाध्यक्ष (१ जागा)
१. अलोक देशपांडे : ८० (विजयी)
२. राजू झनके : ४७ (पराभूत)
३. भगवान परब : ३४ (पराभूत)
नोटा: ७
सरचिटणीस (१ जागा)
१. दिपक भातुसे : ९५ (विजयी
२. प्रवीण पुरो : ६४ (पराभूत)
नोटा: ९
कोषाध्यक्ष (१ जागा)
१. विनोद यादव : १०१ विजयी)
२. मिलिंद लिमये : ४६ (पराभूत)
३. प्रवीण राऊत : १६ (तांत्रिक माघार)
नोटा: ५
कार्यकारिणी सदस्य (५ जागा)
१. मनोज दुबे : १०४ (विजयी)
२. सुजित महामुलकर : १०२ (विजयी)
३. खंडूराज गायकवाड : १०० (विजयी)
४. प्रशांत बारसिंग : ९१ (विजयी)
५. राजन शेलार : ८७ (विजयी)
६. नेहा पुरव : ८३ (पराभूत)
७. अनंत नलावडे : ४५ (पराभूत)
८. रईस अन्सारी : ३७ (पराभूत)
नोटा : ४
अपात्र: १