
मुंबई प्रतिनिधी
मुंबई वरळी येथील प्रेम नगरातून तीन वर्षाच्या मुलीचे अपहरण केल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी पोलिसांनी प्रेम नगर येथून तात्काळ कारवाई करत एका बंगाली महिलेला पोलिसांनी अटक केली असून मुलीचे सुटका केली आहे.
अपहरणाच्या या घटनेचे पोलिसांनी गंभीर दखल घेत प्रेम नगर वरळी येथील काही व्हाट्सअप ग्रुप मदतीने तसेच सीसीटीव्ही फुटेच्या आधारे विभागात कोंबिंग ऑपरेशन केले. त्यादरम्यान एका महिलेला ताब्यात घेऊन एका महिलेकडे चौकशी केली असता गुन्ह्याची कबूली दिली असून मुलीची सुटका केली आहे. वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे तपास पथकाने तात्काळ कारवाई करत तीन तासात मुलीची सुटका केली.दिपाली बबलू दास (४०) अटक केली असून पोलिसांनी भादवि 130 ( 2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.