
सातारा प्रतिनिधी नेटवर्क.
महिला तसेच मुलींविरोधातील अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आहे. अशा प्रकरणात तातडीने अटक होऊन देखील अशा घटना काही कमी होताना दिसत नाहीत. या घटनेत देखील पिडीत मुलीला ब्लॅकमेल करुन तिच्यावर आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
तक्रारदार महिला ही कुर्ला येथे राहत असून पंधरा वर्षांची पीडिता ही तिची मुलगी आहे. आरोपी कार्तिक हा तिचा मित्र असून त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर 15 मे ते 13 जुलै 2024 या कालावधीत जबदस्तीने लैंगिक अत्याचार केला होता. त्याने तिचे काही अश्लील फोटो आणि व्हिडीओ मोबाईलवर काढले होते. तेच फोटो आणि व्हिडीओ दाखवून तो तिला ब्लॅकमेल करुन तिच्यावर सतत अत्याचार करत होता. तिने नकार दिल्यास मारहाण करत होता.
आरोपीकडून होणार्या लैंगिक अत्याचारासह मारहाणीला कंटाळून तिने त्याच्याशी असलेले संबंध तोडून टाकले होते. त्याचा राग आल्याने त्याने तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला होता. तिने तातडीने घडलेला प्रकार पोलिसांना सांगत आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला शनिवारी अटक केली.