
वार्ताहर -स्वप्नील गाडे
आज मंगळवार दि.१/१०/२०२४ वांद्रे पूर्व परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्यां हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाची स्थानिक जनता मागील कित्येक वर्ष आतुरतेने वाट पाहत होती या बाबासाहेबांच्या पुतळ्याची कल्पना प्रस्तावना सर्वप्रथम वांद्रे पूर्व चे स्वर्गीय कार्यसम्राट आमदार प्रकाश बाळा सावंत यांनी केली होती.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउदेशीय सामाजिक प्रतिष्ठाण यांच्या कडून गेले १२वर्ष वारंवार शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आले होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यां पुतळ्याचे अनावरण करण्या मागे अनेक स्थानिक राजकीय नेत्यांचे योगदान आहे असे काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केंद्रीय मंत्री रामदास आठवले भाषण करताना सांगत होते.स्व.कार्यसम्राट आमदार प्रकाश बाळा सावंत यांच्या पत्नी माजी.आमदार तृप्ती बाळा सावंत या कार्यक्रमाला मोलाची उपस्तीती होती त्या भाषणात भावुक होऊन म्हणाल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. आज स्व.बाळा सावंत यांचे स्वप्न पूर्ण झाले असे ते भाषण करताना बोलत होत्या.