मुंबई प्रतिनिधी
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष आणि भीमसैनिकांचे खंदे नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे युवराज कांबळे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून आणि कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
युवराज कांबळे हे सातारा जिल्ह्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. भीमसैनिकांचे संघटन करणे, सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे आणि अन्यायाविरुद्ध लढा देण्यात त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या निष्ठेमुळे पक्षात आणि सामाजिक वर्तुळात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.
या निमित्ताने पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) आणि ‘द पीपल्स फाऊंडेशन’चे अध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी युवराज कांबळे यांना विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.
शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये जिल्ह्यातील असंख्य भीमसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश असून, कांबळे यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.


