
मुंबई:प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार मिळाले आहेत.
यामध्ये महाराष्ट्रात देखील विविध क्षेत्रात मोठं काम करणाऱ्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये नागपूरचे प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार, तसेच प्रतिभावंत लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल चैत्राम पवार यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
केंद्र सरकारनं आज पद्म पुसरस्करांची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 3 जणांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. देशाच्या इतरही भागातील वेगवेगळ्या क्षेत्रातअनोखे काम करणाऱ्यांच्या पद्म पुरस्कारासाठी निवड केली आहे. महाराष्ट्रातून होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रात काम करणाऱ्या मारुती चितमपल्ली यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. चैत्राम पवार यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
मारुती चित्तमपल्ली यांचे कार्य
मारुती चित्तमपल्ली यांनी वन खात्यात 36 वर्षे सेवा केली आहे. त्या काळात देशभर संशोधकवृत्तीने भटकंती. 5 लाख किमी प्रवास. 13 भाषांचे ज्ञान. त्याद्वारे आदिवासी व इतर जमातींशी संवाद साधत मिळवलेली माहिती. त्या माहितीची नोंद केलेल्या व 30 वर्षे जपून ठेवलेल्या शेकडो डायऱ्या आहेत. डायरीतील नोंदीला शास्त्रीय आधार देत पक्षिकोश, प्राणिकोश व मत्स्यकोशाचे लेखन पूर्ण. अरण्यवाचनासह प्राणी, पक्षी, वनस्पतीची वैशिष्ट्यांसह वन्य जीवन विषद करणारी 25 पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत. निसर्गातील हा ठेवा समाजाला कळावा या भावनेतून सतत कार्यरत हा सकारात्मक विचाराचा ऊर्जाकोश म्हणजे विख्यात लेखक मारुती चितमपल्ली.
मी मराठी नवीन एक लाख शब्द दिले, पुरस्कार मिळाल्याचा आनंद
आज मला प्रचंड आनंद झाला असल्याचे मत पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर मारुती चित्तमपल्ली यांनी व्यक्त केले. मी मराठी नवीन एक लाख शब्द दिले आहेत. सध्या त्याच शब्दकोशावर मी काम करत असल्याचे चित्तमपल्ली म्हणाले. अपेक्षा होतीच पुरस्काराची मात्र आज पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आनंद होत असल्याचे चित्तमपल्ली म्हणाले.
डॉ. विलास डांगरे यांची वैद्यकीय सेवेतील भीष्म पितामह अशी ओळख
महाराष्ट्रातील प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे यांचा समावेश आहे. डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. संपूर्ण विदर्भात वैद्यकीय सेवेतले भीष्म पितामह अशी डॉ. डांगरे यांची ओळख आहे. गेल्या ५० वर्षात त्यांनी एक लाखाहून अधिक रुग्णांना बरं केलं.
वन्यजीव आणि पर्यावरण क्षेत्रात चैत्राम पवार यांचं उल्लेखनिय कार्य
चैत्राम पवार यांनी बारीपाडा येथे प्रथम पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर उपलब्ध केले आहेत. असून धुळे जिल्ह्यात ते नियमितपणे अद्यावत केले जाते. संरक्षित क्षेत्रातून लागवड नसलेल्या रानभाज्यांची रेसिपी करुन जंगलातील पारंपरिक ज्ञान त्यांनी इतरांपर्यंत पोहोचवले आहे. सिंचनासाठी भूजलाचा काटकसरीने वापर, मृद व जलसंधारणाची कामे, सौर ऊर्जेचा वापर, प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न, सार्वजनिक आरोग्यविषयक प्रश्नांची सोडवणूक आदी माध्यमातून त्यांनी केलेल्या कामाची दखल राज्य शासनाने या सर्वोच्च पुरस्काराच्या माध्यमातून घेतली आहे. चैत्राम पवार यांना यापूर्वी विविध पुरस्कारांनी गौरविले गेले असून यामध्ये आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी-2023, भारत जैवविविधता पुरस्कार-2014, संत तुकाराम वनग्राम पुरस्कार, शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, आदिवासी सेवक पुरस्कार, डॉ. हेडगेवार स्मृती सेवा निधी कार्य पुरस्कार, वसुंधरा पुरस्कार, आदिवासी अस्मिता पुरस्कार, नातू फौंडेशन सेवाव्रत कार्यकर्ता पुरस्कार, पु. भा. भावे स्मृती पुरस्कार, संस्कार कवच पुरस्कार, गो. नी. दांडेकर स्मृती नीरा गोपाल पुरस्कार आणि राज्य शासनाचा जलनायक पुरस्कार आदींचा समावेश आहे.