
मुंबई:प्रतिनिधी
रिक्षा आणि टॅक्सीने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबईमध्ये रिक्षा आणि टॅक्सी प्रवास महागणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यामध्ये वाढ झाली आहे.
येत्या १ एप्रिलपासून ही नवी दरवाढ लागू होणार आहे. रिक्षा-टॅक्सीच्या दरात ३ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास मागणार असून सामान्य नागरिकांचा खिशाला आणखी कात्री लागणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात आता ३ रुपयांची वाढ होणार असून येत्या एक फेब्रुवारीपासून नवा दर लागू होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबईत सध्या रिक्षाचे किमान भाडं २३ रुपये तर टॅक्सीचे किमान भाडं २८ रुपये इतका आहे. त्यात ३ रुपये वाढ झाल्यामुळे एक फेब्रुवारीपासून रिक्षाचे किमान भाडे २६ रुपये होईल. तर टॅक्सीच्या किमान भाड्यासाठी मुंबईकरांना ३१ रुपये मोजावे लागणार असून सामान्य नागरिकांच्या खिशावर आणखी ताण येणार आहे.