मुंबई प्रतिनिधी
नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर
राज्यातील दारू दुकानांना तसेच पब–बारना मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. २४, २५ आणि ३१ डिसेंबर या दिवशी मद्यविक्रीची वेळ वाढवण्यात आली असून याबाबतचे आदेश गृह विभागाकडून जारी करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था लक्षात घेऊन परवानगी नाकारण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे राहणार आहे.
या कालावधीत राज्यभरात मद्यविक्री वाढत असल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. त्यानुसार ठराविक अटींवर दुकाने व बार सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
पब–बार पहाटेपर्यंत; बिअर–वाइन दुकानांना रात्री १ वाजेपर्यंत परवानगी
गृह विभागाच्या परिपत्रकानुसार
दारूची किरकोळ दुकाने : रात्री १ वाजेपर्यं
पब व बार : पहाटे ५ वाजेपर्यंत
बिअर/वाइन दुकाने : रात्री १ वाजेपर्यंत मुदतवाढ
तसेच,
FLBR-II परवानाधारकांनाही त्याचप्रमाणे सवलत
FL–3 आणि FL–4 परवाने
पोलीस आयुक्तालय क्षेत्रात : रात्री १.३० ते पहाटे ५
इतर क्षेत्रांत : रात्री ११.३० ते पहाटे ५
ई (बिअर बार) व E-2 परवानाधारकांना रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत विक्रीची परवानगी असेल.
बंदोबस्त कडक, ड्रंक अँड ड्राइव्हवर विशेष लक्ष
नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
गैरप्रकारांवर नियंत्रणासाठी रात्रीची गस्त
संशयित वाहनांची तपासणी
अनधिकृत ढाबे व फार्महाऊसवर कारवाई
अवैध दारू विक्रीवर उत्पादन शुल्क विभागाची पथके तैनात
वाहतूक विभागाकडून ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ या विशेष मोहिमेद्वारे तपासणी केली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, महिलांशी गैरवर्तन, अंमली पदार्थांची विक्री–सेवन याप्रकरणी कडक कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.


