
मुंबई: प्रतिनिधी
लवकरच जेएनपीए ते मुंबई दरम्यान सागरी मार्गाने प्रवासासाठी इलेक्ट्रिकल फेरी बोट सुरु होणार आहे. हरित सागर योजनेअंतर्गत, मुंबईमधील गेटवे ऑफ इंडिया आणि भाऊचा धक्का ते जेएनपीए न्हावा शेवा मार्गावर इलेक्ट्रिक फेरी सेवा सुरू होणार आहे.
संपूर्ण मुंबई हार्बरवर चालवली जाईल. एकूण 24 पॅक्स क्षमतेसह असलेली ही बोट प्रवासाचा वेळ जवळजवळ 20-30 मिनिटांनी कमी करेल. ही नवीन इलेक्ट्रिक बोट वातानुकूलित आसन व्यवस्थेसह सुसज्ज असेल. जवाहरलाल नेहरू पोर्ट मुंबईशी अखंडपणे जोडणे, प्रत्येकासाठी वाहतूक अधिक सोयीस्कर बनवणे हा या सेवेमागील उद्देश आहे.