
मुंबई:प्रतिनिधी
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबईतील खारघर येथील आशिया खंडातील दुसऱ्या इस्कॉन मंदिराचे आज उद्घाटन केलं. इस्कॉनच्या प्रयत्नांनी ज्ञान आणि भक्तीच्या या महान भूमीवर श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचे उद्घाटन केले.
या दिव्य उद्घाटनात भूमिका बजावण्याचे आशीर्वाद मला मिळत आहेत हे माझे भाग्य आहे, असं यावेळी ते म्हणाले.
“वसाहतवादाच्या काळात, श्रील प्रभुपादांनी ‘वेद, वेदांत आणि गीता’चे महत्त्व पुढे नेले. त्यांनी वेदांतला लोकांच्या चेतनेशी जोडण्याचा काम केलं. 70 व्या वर्षी लोक निवृत्त होण्याचा विचार करतात. मात्र, श्री पाद यांनी इस्कॉनचे ध्येय सुरू केले…” असं मोदी म्हणाले.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप खासदार हेमा मालिनी त्यांच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित आहेत.
असं आहे भव्य इस्कॉन मंदिर!
इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभूपाद यांचे स्मारक असेलेले पहिले मंदिर असणार आहे. खारघर, नवी मुंबई, सेक्टर 23 मध्ये मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिरला एकूण 12 वर्षांचा बाधकांम कालावधी लागला आहे.
पांढऱ्या आणि तपकिरी संगमरवराच्या खास दगडांनी बांधलेले हे भव्य मंदिर आहे. या मंदिराच्या निर्मितीसाठी आतापर्यंत 200 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आले आहे. मंदिराचा गाभा भगवान कृष्णाच्या अनेक मनोरंजक 3D चित्रांची प्रदर्शनी लावण्यात आले आहे.
मंदिराचे दरवाजे चांदीचे
दशावतार मंदिराचे दरवाजे चांदीचे आहेत. ज्यांवर गदा, शंख, चक्र आणि ध्वजाच्या सुवर्ण प्रतिमा कोरलेल्या आहेत. ग्लोरी ऑफ महाराष्ट्र प्रकल्पाअंतर्गत हे मंदिर बांधण्यात आले आहे.
नवी मुंबईतील मंदिर खास
इस्कॉन मंदिराचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांच्या तीन मूर्ती, देश-विदेशातील त्यांच्या अनुयायांच्या मूर्ती, छायाचित्रे आणि पुस्तके यांचे स्मारकही बांधण्यात आले आहे. इस्कॉनची जगात 800 मंदिरे आहेत. परंतु नवी मुंबईतील हे मंदिर एकमेव असे मंदिर असणार आहे, ज्यामध्ये इस्कॉनचे संस्थापक प्रभूपाद यांचे स्मारक आहे.