पाकीस्तान:
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रकृतीविषयी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. आदियाला तुरुंगात कठोर बंदोबस्तात ठेवलेल्या इम्रान खान यांची त्यांच्या बहिणी उज्मा खान यांनी मंगळवारी 20 मिनिटांची भेट घेतल्यानंतर परिस्थितीबाबतचा संभ्रम दूर झाला.
Breaking news 🚨 🚨
After a month of solitary confinement, Imran Khan has finally been allowed to meet his sister, Dr. Uzma Khan. Following the meeting, Dr. Uzma revealed that the @PTIofficial founder Imran Khan, is in good physical health, but was extremely angry.Imran Khan… pic.twitter.com/2BJY045HsJ
— ZEShan ⚫ (@zeshmohmand) December 2, 2025
तुरुंग प्रशासनाकडून सलग तीन आठवडे कोणालाही भेटण्याची परवानगी नाकारल्यानंतर पीटीआय कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी उसळली होती. रावळपिंडीतील निदर्शनांदरम्यान सरकारने कलम 144 लागू करून जमावबंदी जाहीर केली. या तणावपूर्ण वातावरणात उज्मा खान यांना अखेर भेट मंजूर करण्यात आली.
भेटीनंतर बहिणीचा खुलासा: “इम्रान ठीक आहेत, पण मानसिक छळ सुरू”
भेटीनंतर माध्यमांशी बोलताना उज्मा म्हणाल्या,
“इम्रान खान पूर्णपणे जिवंत आहेत. त्यांची प्रकृती ठीक असली तरी त्यांना सतत मानसिक त्रास दिला जात आहे. भेटीदरम्यान ते अत्यंत संतापलेले आणि अस्वस्थ दिसले.”
तुरुंग प्रशासनाविरुद्ध न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल केल्यानंतरच ही भेट मिळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रकृती आणि ठिकाणाबाबत पसरलेल्या अफवांवर पडला पडदा
इम्रान खान कुठे आहेत, ते सुरक्षित आहेत का, याबाबत त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. काहींनी तर “सरकारने त्यांची हत्या केली का?” असा थेट प्रश्नही उपस्थित केला होता.
त्यांची शेवटची सोशल मीडिया पोस्ट ५ नोव्हेंबरची असून त्यानंतर त्यांची कोणतीही हालचाल सार्वजनिकरित्या दिसली नव्हती. यामुळेच अफवांना आणखी उधाण आले होते.
इम्रान खान यांच्या मुलांनीही तुरुंग प्रशासनाकडे अधिकृत माहितीची मागणी केली होती. मात्र प्रशासनाकडून कोणतेही स्पष्ट उत्तर न मिळाल्याने परिस्थिती अधिक गोंधळलेली होती.
निदर्शने पेटली, सरकारवर आरोपांचा पाऊस
पीटीआयचे हजारो समर्थक रावळपिंडीमध्ये इम्रान खान यांची भेट मिळावी, तसेच त्यांची प्रकृती आणि सुरक्षिततेबाबत सत्य बाहेर यावे म्हणून रस्त्यावर उतरले. सरकारने कलम 144 लागू करून जमावबंदी केली असली तरी आंदोलनकर्त्यांची संख्या मोठीच होती.
पडदा मागील राजकारण?
५ नोव्हेंबरच्या आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये इम्रान खान यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यावर “देशावर पूर्ण ताबा मिळवल्याचा” आरोप करत कडक शब्दांत टीका केली होती. त्यानंतर अचानक बाहेरील जगाशी त्यांचा संपर्क तुटला.
या पार्श्वभूमीवर बहिणीच्या भेटीने किमान त्यांच्या जिवंत असल्याचा संभ्रम दूर झाला असला तरी त्यांच्या सुरक्षिततेबाबतच्या शंका मात्र कायम आहेत.


