अयोध्या :
अयोध्येतील नव्याने उभारलेल्या भव्य राममंदिराच्या शिखरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अभिजित मुहूर्तावर धर्मध्वजाची प्रतिष्ठापना केली. राष्ट्रभरातील लक्ष वेधून घेणाऱ्या या क्षणानंतर पंतप्रधानांनी जनसमुदायाला संबोधित करताना हा दिवस “भारताच्या सांस्कृतिक चेतनेतील महत्त्वाचा टप्पा” ठरल्याचे सांगितले.

ध्वजारोहणानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आज फडकलेला हा ध्वज अनेक युगांपासूनच्या स्वप्नांची, संघर्षांची आणि साधनेची साकार प्रतिमा आहे. हा ध्वज केवळ परंपरेचा नाही, तर सत्य, धर्म आणि संकल्पशक्तीचा घोषक आहे.”
ते पुढे म्हणाले, “शतकानुशतके मनात घर करून बसलेली वेदना, अनेक पिढ्यांची प्रतीक्षा आणि साधना,आज त्यांना विराम लाभला आहे. अनेक शतकांपासूनच्या जखमा भरल्या जात असल्याची भावना आज प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणात आहे.”
#WATCH | Ayodhya Dhwajarohan | PM Modi says, "…Humein aane wale 1000 varshon ke liye Bharat ki neev mazboot karni hai. Jo sirf vartaman ka sochte hain wo aane wali pidhiyon ke saath anyaay karte hain. Humein bhavi pidhiyon ke baare mein bhi sochna hai. Hum jab nahi the yeh desh… pic.twitter.com/cS7iqgi495
— ANI (@ANI) November 25, 2025
‘सत्यमेव जयते’चा प्रतिध्वनी
पंतप्रधानांनी ध्वजावरील प्रतीकशास्त्राचे महत्त्व विशद करताना तो केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक मूल्यांचा वाहक असल्याचे स्पष्ट केले.
भगवा रंग, सूर्यवंशीय चिन्ह आणि कोविदार वृक्षाचे प्रतिरूप—या सर्वांना रामराज्याच्या आदर्शांशी जोडत त्यांनी सांगितले की, हा ध्वज न्याय, कर्तव्य आणि करुणेची आठवण करून देणारा आहे.
“प्राण जाए पर वचन न जाए” या संदेशाशी ध्वज संलग्न असल्याचे ते म्हणाले.
‘राममय’ भारत : भावनिक क्षणांची नोंद
अयोध्या नगरी आज “भारतीय सांस्कृतिक चेतनेच्या नवीन बिंदूची साक्षीदार ठरत आहे”, असे सांगताना मोदी भावूक झाले.
“संपूर्ण भारत आणि जग राममय झाले आहे. प्रत्येक भक्ताच्या हृदयात अपार आनंद आहे,” असे त्यांचे म्हणणे.
मंदिरात येऊ न शकणाऱ्या भक्तांनाही या ध्वजाला दूरून केलेला प्रणाम पुण्यप्राप्तीसमान असल्याचे त्यांनी नमूद केले.
#WATCH | Ayodhya, UP: Prime Minister Narendra Modi greets the invitees who are present at Shri Ram Janmbhoomi Mandir complex, after concluding his address at the Ayodhya Dhwajarohan ceremony.
(Video: DD) pic.twitter.com/COO9h1lpOF
— ANI (@ANI) November 25, 2025
समरस समाजाची प्रेरणा
धर्मध्वजाचे महत्त्व विशद करताना मोदींनी समाजनिर्मितीच्या व्यापक ध्येयाची मांडणी केली.
“हा ध्वज असा समाज उभारण्याची प्रेरणा देतो, जिथे गरीबी नसावी, कोणी दुःखी किंवा लाचार नसावे. संकल्प, साधना आणि सफलता यांचे प्रतीक असलेला हा ध्वज भविष्याच्या दिशा दाखवतो,” असे ते म्हणाले.


