
सातारा प्रतिनिधी न्यूज नेटवर्क
शेतमालाची चोरी होते सर्वांनाच माहित आहे मात्र विहिरीवरील पंप चोरून नेल्याचे घटना बारामतीत घडली आहे. शेतकऱ्यांनी तक्रार दाखल करताच ॲक्शन मोडवर असलेल्या बारामती पोलिसांनी 6 आरोपींना अटक करून 18 वीज पंप हस्तगत केले आहेत.
ऑनलाइन रमीच्या नादात ह्या 6 आरोपींनी विज पंप चोरल्याची माहिती दिली. असून विशेष बाब म्हणजे ही सहाही आरोपी शेतकऱ्यांची मुले आहेत. कामधंदा नसल्याने तसेच दारूचे व्यसन जडल्याने प्रथम दर्शनी दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बारामती तालुक्यातील लोणी भापकर व सायंबाची वाडी या गावातील तब्बल 18 वीज पंप चोरी करणाऱ्यांची टोळी वडगाव निंबाळकर पोलिसांनी शोधली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तब्बल सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून सहा जणांना अटक केली आहे. हे सहा जण स्थानिक व शेतकऱ्यांची मुले असल्याचे दिसून आले आहे. ऑनलाइन रमी च्या नादात या चोऱ्या झाल्याचे पोलिसांनी शोधून काढल्याने पालक देखील चिंतेत आहेत.
बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथील पाच शेतकऱ्यांनी ऑक्टोबर 2024 ते जानेवारी 2025 पर्यंत सहा वीज पंप चोरीला गेल्याची फिर्याद वडगाव निंबाळकर पोलिसांकडे दिली होती त्यावरून पोलिसांनी शोध घेतला असता सहा जणांना ताब्यात घेतले दरम्यान या सहा जणांनी फक्त लोणी भापकर गावातीलच नाही तर साहेबाची वाडी या गावातीलही विहिरीवरील व विंधन विहिरीवरील पाणबुड्या वीज पंप चोरले असल्याचे उघडकीस आले.
या प्रकरणात वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार तौफिक मणेरी, भाऊसाहेब मारकड यांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला आणि लोणीभापकर मधील ओंकार राजेश आरडे, महेश दिलीप भापकर, प्रथमेश जालिंदर कांबळे, निलेश दत्तात्रेय मदने व जळकेवाडी येथील अमोल लहू कदम या पाच जणांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी या वीज पंपांची चोरी केल्याचे कबूल केले. आणि लोणीभापकर येथीलच कालिदास शिवाजी भोसले याला या वीज पंपांची विक्री केल्याची कबुली दिली. त्यावरून त्या सहा जणांना पोलिसांनी अटक केली. या चोरीच्या गुन्ह्यातील तब्बल 18 20 पंप पोलिसांनी हस्तगत केले असून तीन लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल हे जप्त केला आहे.
ही विशेष कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार राहुल साबळे, दिलीप सुतार, हवालदार अनिल खेडकर, तौफिक मणेरी, महेश पन्हाळे, सूर्यकांत कुलकर्णी, भाऊसाहेब मारकड, सहाय्यक फौजदार बाळासाहेब कारंडे, सुनील बालगुडे हवालदार हृदयनाथ देवकर, पोपट नाळे, सागर चौधरी, आबा जाधव, सुरज धोत्रे, विजय शेंडकर, शाहूराज भोसले, नागनाथ परगे, विलास ओमासे, धनंजय भोसले, राजेंद्र सावंत, सोमनाथ ढाणे, भानुदास सरक, विकास ईटाळे, अरुण सोनवणे यांच्या पथकाने केली. हि कारवाई कुशलतेने पार पडल्याने वरिष्ठांकडून तपास पथकाचेच अभिनंदन केले आहे.