पुणे प्रतिनिधी
राज्यभरातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना अपेक्षित असलेल्या बोर्ड परीक्षांच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी–मार्च २०२६ या कालावधीत होणाऱ्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून, या परीक्षांसाठी विद्यार्थी, पालक आणि शाळांनी तयारीसुरू ठेवावी, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
• बारावीची परीक्षा : १० फेब्रुवारी ते १८ मार्च
बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.
माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाइन परीक्षा याच कालावधीत
प्रात्यक्षिक परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी
• दहावीची परीक्षा : २० फेब्रुवारी ते १८ मार्च
दहावीच्या लेखी परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरू होणार असून १८ मार्चपर्यंत चालणार आहेत.
प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यांकन
२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी
या परीक्षा पुणे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर आणि कोकण या मंडळांतर्गत घेतल्या जाणार आहेत.
• अभ्यासाचे नियोजन करा, ताण कमी करा
विद्यार्थ्यांनी योग्य वेळापत्रक आखून अभ्यासाला सुरुवात करावी. परीक्षेच्या तारखा आधीच जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक ताण कमी होऊन अभ्यासाची दिशा स्पष्ट होईल, असा उद्देश मंडळाने व्यक्त केला आहे.
• सोशल मीडियावरील वेळापत्रकांवर विश्वास ठेवू नका!
राज्य मंडळाने कडक इशारा देत सांगितले आहे की,
सोशल मीडिया किंवा अप्रमाणित प्लॅटफॉर्मवरील वेळापत्रकांवर विश्वास ठेवू नये
शाळांना देण्यात येणारे छापील वेळापत्रकच अंतिम असेल
मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रक फक्त माहितीसाठी
विद्यार्थ्यांनी व पालकांनी अधिकृत वेळापत्रकाचीच नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.


