
पुणे प्रतिनिधी
पुणेकरांसाठी म्हाडाकडून मोठी दिलासा देणारी बातमी. वाढत्या घरांच्या किमतींमुळे घर खरेदीचं स्वप्न अनेकांसाठी दुरावलेलं असताना, म्हाडा पुणे मंडळाने कमी किमतीत प्रीमियम घर देण्याची खास संधी उपलब्ध करून दिली आहे.

पुण्यातील लोकप्रिय व वेगाने विकसित होणाऱ्या वाकड परिसरातील ‘Yashwin Urbo Centro’ या प्रकल्पातील तब्बल 28 फ्लॅट्ससाठी विशेष लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. साधारणपणे 80 ते 90 लाख रुपयांच्या घरांच्या किमती असलेल्या या 2 आणि 3 बीएचके घरांसाठी केवळ 28 लाख रुपये आकारण्यात येणार आहेत.
हा प्रकल्प भूमकर चौकाजवळ, इंदिरा गांधी कॉलेज परिसरात हायवे टच लोकेशनवर असून, सुप्रसिद्ध विलास जावळकर ग्रुपकडून बांधकाम करण्यात येत आहे. फ्लॅट्सचा कार्पेट एरिया 500 ते 600 चौ.फुट दरम्यान आहे.

अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन ठेवण्यात आली असून इच्छुक नागरिकांनी lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर जाऊन Pune Board Lottery 2025 विभागातून अर्ज करावा. नोंदणी, कागदपत्रे अपलोड व शुल्क भरणे या सर्व प्रक्रिया घरबसल्या करता येणार आहेत.
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 20 नोव्हेंबर 2025, रात्री 11:59 वाजेपर्यंत
पुण्यातील अत्यंत मागणी असलेल्या परिसरात वाजवी दरात घर देण्याचा हा प्रयत्न असून, मध्यमवर्गीयांसाठी ही संधी “खरा दिलासा” ठरणार आहे.
पुण्यात स्वत:चं घर घेण्याचं स्वप्न साकार करायचं असेल, तर ही संधी चुकवू नका!


