
पत्रकार :उमेश गायगवळे
विलेपार्लेतील एका ज्येष्ठ महिलेच्या घरात घुसून तिला व तिच्या दिव्यांग घरकाम करणाऱ्या महिलेस हातपाय बांधून तोंडावर चिकटपट्टी लावून घरातील सुमारे साडेसात लाखाहून अधिक ऐवज, रोख रक्कम असा ऐवज चोरणाऱ्याला परिमंडळ आठच्या पथकाने शिफायतीने अटक केली.
विलेपार्ले परिसरात राहणाऱ्या वृद्ध दापत्याच्या घरी जेष्ठ महिलेला, तसेच तीच्या तसेच घरकाम करणाऱ्या महिलांचे हातपाय बांधून तोंडावर चिकटपटी लावून घरातील रोख रकमेसह अंगावरील सोन्याचे दागिने सुमारे ६ लाख ८० हजार तसेच कपाटातील १ लाख ५ हजार असे एकूण 7लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला. मात्र एका महिलेच्या सांगण्यावरून आरोपीला युनिट ८ पथकाने बाहेरगावी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला ठाणे येथून अटक केली असून त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.