मुंबई प्रतिनिधी
राज्य सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणविषयक कार्याला अभिवादन म्हणून मोठं पाऊल उचललं आहे. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या ‘द पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ अंतर्गत येणाऱ्या नऊ शैक्षणिक संस्था आणि दोन वसतिगृहांच्या जतन, संवर्धन आणि विकासासाठी तब्बल पाचशे कोटी रुपयांच्या विशेष योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत पुढील पाच वर्षांमध्ये दरवर्षी १०० कोटी रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे. या माध्यमातून संस्थांच्या इमारतींचा जीर्णोद्धार, आधुनिक सुविधा, प्रयोगशाळा, ग्रंथालये आणि वसतिगृहांचा दर्जा उंचावण्याचे काम होणार आहे.
डॉ. आंबेडकर यांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे शस्त्र मानून ८ जुलै १९४५ रोजी ‘द पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ ची स्थापना केली होती. या संस्थेमार्फत त्यांनी सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस, सिद्धार्थ नाईट हायस्कूल (मुंबई), मिलिंद कॉलेज ऑफ आर्ट्स, मिलिंद कॉलेज ऑफ सायन्स, मिलिंद मल्टिपर्पज हायस्कूल, मिलिंद प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूल (छत्रपती संभाजीनगर), सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स (वडाळा) अशा संस्थांची उभारणी केली.
याचबरोबर अजिंठा बॉईज होस्टेल आणि प्रज्ञा गर्ल्स हॉस्टेल या वसतिगृहांद्वारे विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाबरोबरच निवासाचीही सोय करण्यात आली.
डॉ. आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारसरणी आणि कार्याशी निगडित संस्थांच्या विकासाचा निर्णय राज्य सरकारने पूर्वी घेतला होता. त्याला आता मूर्त स्वरूप मिळत असून, या निर्णयामुळे आंबेडकरांनी घातलेला शिक्षणप्रबोधनाचा पाया अधिक मजबूत होणार आहे.
आंबेडकरांच्या शिक्षणसंस्थांना नवी झळाळी; पाचशे कोटींचा विकासनिधी मंजूर

राज्य सरकारच्या या उपक्रमामुळे डॉ. आंबेडकरांचे ‘शिक्षण हेच मुक्तीचे द्वार’ हे विचारधन नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.