
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई| अंधेरी पोलिसांनी मोबाईल शॉप फोडून चोरी करणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांना मुंब्रा, तुर्भे आणि डोंगरी परिसरातून अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेली १२३ नामांकित ब्रँडची घड्याळे पोलिसांनी जप्त केली आहेत.
७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजता ते ८ सप्टेंबर सकाळी १० वाजेपर्यंत अंधेरी मेट्रो स्टेशनखालील अरीहंत मोबाईल सेल्स अँड सर्व्हिसेस या दुकानातील ग्रील व कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. त्यांनी १५० घड्याळे, १० मोबाईल व रोख रक्कम असा माल चोरला. फिर्यादी दिलीप निसर (वय ३५) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी सापळा रचत प्रयत्न केले. अखेर चार आरोपींना अटक करण्यात आली, त्यापैकी तिघे हे पूर्वीपासूनच वॉंटेड होते.
अटक आरोपी: मोईनुद्दीन नझीम शेख (४६), मुंब्रा; साबीर मुस्तफा शेख (४०), वाशी – यापूर्वी २ गुन्हे; अमरूद्दीन अलीहसन शेख (६०), डोंगरी – यापूर्वी ५ गुन्हे; प्रभु भागल चौधरी (३०), ऐरोली – यापूर्वी ५ गुन्हे
टायटन, फास्ट्रॅक, सोनाटा व डिजायर या नामांकित कंपन्यांची १२३ घड्याळे जप्त करण्यात आली आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त बृहमुंबई देवेन भारती, सह आयुक्त (का. व सु.) सत्यनारायण, अपर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग परमजित सिंह दहिया, पोलीस उपायुक्त परिमंडळ १० दत्ता नलावडे व सहाय्यक पोलीस आयुक्त अंधेरी विभाग गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मचिंदर व पो.नि. (गुन्हे) विनोद पाटील यांच्या देखरेखीखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पो.उपनि. किशोर परकाळे, पो.उपनि. समाधान सुपे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन ही कारवाई यशस्वी केली.