
मुंबई प्रतिनिधी
महागाईनं आधीच श्वास घ्यायला महाग केलेला असताना आता बँकाही ग्राहकांच्या खिशावर सरळ वार करणार आहेत. 15 ऑगस्टपासून देशातील सर्वात मोठी बँक – एसबीआय – मोफत मानल्या जाणाऱ्या ‘आयएमपीएस’ व्यवहारांवर शुल्क आकारणार आहे.
२५ हजार रुपयांपर्यंतच्या ट्रान्सफरला सूट असली तरी त्यापुढे प्रत्येक व्यवहारावर थेट फटका!
* एसबीआयपाठोपाठ इतर बँकाही लवकरच हा ‘शुल्कहल्ला’ करणार, अशी जोरदार शक्यता.
म्हणजेच, पैशाचे व्यवहार करणं आता केवळ तुमच्या पैशांवरच नव्हे, तर तुमच्या संयमावरही भारी पडणार आहे.
आधीच झालेली शुल्कवाढ:
* एटीएमवर फ्री लिमिट ओलांडली? प्रत्येक अतिरिक्त व्यवहारावर ₹23 कपात.
* १ जुलैपासून क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल – नवी शुल्कं लावली.
* बँकेच्या छोट्या-छोट्या सेवा? आता ‘मोफत’ या शब्दाचा विसर पडा.
आता पैशासाठी पैसे मोजावे लागणाऱ्या सुविधा:
* पासबुक अपडेट
* फ्री लिमिटनंतर कॅश डिपॉझिट आणि कॅश विड्रॉल
* डुप्लिकेट पासबुक : ₹100
* साइन व्हेरिफिकेशन, चेक स्टॉपेज
* मोबाईल नंबर किंवा ईमेल अपडेट
* एसएमएस सेवा शुल्क
पूर्वी हसत-हसत दिल्या जाणाऱ्या सेवा आता पैशाने मोजाव्या लागतील.
म्हणूनच –
* अचानक खात्यातून पैसे कापले तर धक्का खाऊ नका!
* बदलणारे नियम वाचा, समजून घ्या, आणि तुमच्या पैशावर कुणाचं गुपचूप हात साफ होऊ देऊ नका.
बँकिंग महागाईच्या वावटळीत फसलंय, आणि ग्राहकांच्या खिशावरचा ताण अजून वाढणार आहे.