पुणे प्रतिनिधी
मंगळवार पेठेतील सिंचन भवन, सर विश्वेश्वरय्या सभागृहात शनिवारी “शोध अभियांत्रिकी मनाचा” या गुणगौरव सोहळ्याचा जल्लोष अनुभवायला मिळाला. साहित्य, अभियांत्रिकी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या भव्य समारंभात विविध पुरस्कार, ग्रंथप्रकाशन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि प्रबोधनपर व्याख्याने यांचा समावेश होता.

समारंभाचे अध्यक्षस्थान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी भूषवले. कार्यक्रमात “अभियंता मित्र” मासिकाचा ३९ वा वर्धापन दिन, स्व. मोतीलालजी धूत आणि स्व. प्रभाकर गानू शिष्यवृत्ती प्रदान, लेखक-अभियंत्यांचा सत्कार, तसेच उत्कृष्ट अभियंता पुरस्कार सोहळा यांचा समावेश होता.
याच मंचावर सेवाभावी अभियंता म्हणून विशेष गौरव प्राप्त झाला. २०१९ मध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत आलेल्या महापूरस्थितीत पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय प्रयत्नांची प्रशंसा करत मान्यवरांच्या हस्ते निवृत्त जल अभियंता जीवन पाटील मुंबई यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर अनेक मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी मी “मुंबईचा पाणीपुरवठा व जलवाहिनी दुरुस्ती” या विषयावरची पुस्तिका डॉ. श्रीपाल सबनीस आणि श्री दिनकर गोजारे (मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पुणे महापालिका) यांना प्रदान केली.
मान्यवर उपस्थिती :
* डॉ. श्रीपाल सबनीस – अध्यक्ष, समारंभ
* अँड. पुरुषोत्तम खेडेकर – संस्थापक, मराठा सेवा संघ
* दिनकर गोजारे – मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पुणे महानगरपालिका
* युवराज देशमुख – मुख्य अभियंता (निवृत्त)
* योगेश भोसले – कनिष्ठ अभियंता, पुणे महानगरपालिका
पावसाळी हवामान व वाहतुकीतील अडचणी असूनही, साहित्य व अभियांत्रिकी क्षेत्रातील अनेक दिग्गज, अभियंते, विद्यार्थी आणि अभ्यागतांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
गौरव सोहळ्याचे प्रमुख आयोजक व “अभियंता मित्र” मासिकाचे संपादक डॉ. कमलकांत वडेलकर यांचे विशेष आभार मानण्यात आले.
या प्रसंगी इंजी. प्रवीण पाटील आणि दैनिक विजय सागर साप्ताहिक चे संपादक विजय मोकल यांचीही उपस्थिती होती. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर साहित्यिक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


