
मुंबई प्रतिनिधी
देशातील कोट्यवधी सामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. 1 ऑगस्ट 2025 पासून देशभरात विविध क्षेत्रांतील अनेक नियम बदलणार आहेत. या नव्या नियमांचा थेट परिणाम सामान्यांच्या खिशावर पडणार असून आर्थिक फटक्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या बदलांमध्ये एलपीजी, सीएनजी-पीएनजी, विमान इंधन (ATF), क्रेडिट कार्ड विमा, आणि UPI व्यवहारांमध्ये मोठे बदल होणार आहेत. यामुळे नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या बदलांविषयी सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे —
* क्रेडिट कार्डधारकांसाठी धक्का – विमा सुविधा बंद
एसबीआय कार्डधारकांसाठी एक मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. 11 ऑगस्ट 2025 पासून एसबीआय काही को-ब्रँडेड क्रेडिट कार्डवर मोफत हवाई अपघात विमा सुविधा बंद करत आहे.
ज्यात युको बँक, सेंट्रल बँक, पीएसबी, करूर वैश्य बँक, अलाहाबाद बँक व इतर बँकांच्या काही एलिट/प्राइम कार्डांचा समावेश आहे.
आधी यावर ५० लाखांपासून १ कोटी रुपयांपर्यंतचा विमा कव्हर मिळत असे, पण आता तो लाभ मिळणार नाही.
* एलपीजी सिलिंडरचे दर होणार बदल
दर महिन्याच्या 1 तारखेला घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये बदल होतो.
1 जुलै रोजी 60 रुपयांनी दरात घट झाली होती, मात्र 1 ऑगस्टला पुन्हा दरवाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरगुती अर्थसंकल्प डगमगू शकतो.
* CNG-PNG दरही होऊ शकतात महाग
सीएनजी आणि पीएनजीच्या किमती एप्रिलपासून स्थिर असल्या तरी 1 ऑगस्टपासून त्यात बदल होण्याची शक्यता आहे.
दर वाढल्यास रिक्षा, टॅक्सी आणि इतर वाहतूक दरही वाढू शकतात. याचा सर्वसामान्य प्रवाशांवर मोठा परिणाम होणार आहे.
* ATF दरात होऊ शकते वाढ – विमान प्रवास महागण्याची शक्यता
1 ऑगस्टपासून विमान इंधन (एअर टर्बाइन फ्युएल) च्या दरात वाढ होऊ शकते.
जर एटीएफचे दर वाढले, तर घरेलू व आंतरराष्ट्रीय विमानांच्या तिकिटांच्या किमतीतही वाढ होऊ शकते.
प्रवास स्वस्त ठेवायचा असेल तर केंद्र सरकारकडून काही उपाय अपेक्षित आहेत.
* UPI व्यवहारांमध्ये नवे नियम – ‘हे’ बदल जाणून घ्या
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने 1 ऑगस्टपासून UPI व्यवहारांसाठी नवे नियम लागू करण्याची घोषणा केली आहे.
* दिवसातून केवळ 50 वेळा बॅलन्स चेक करण्याची मर्यादा
* UPI ऑटोपे व्यवहार केवळ तीन वेळांमध्येच शक्य – सकाळी 10 पूर्वी, दुपारी 1 ते 5, आणि रात्री 9.30 नंतरच.
* इतर तांत्रिक नियम व सुधारणा लवकरच जारी केल्या जाणार.
* पेट्रोल-डिझेल दरातही बदल संभव
जसजसे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत आहेत, तसतसे पेट्रोल व डिझेल दरातही 1 ऑगस्टपासून संभाव्य बदलाची शक्यता आहे.
सरकारने सबसिडी किंवा कर रचना बदलल्यास दरात मोठा फरक पडू शकतो.
* नागरिकांनी काय करावे?
* आपले UPI अॅप अपडेट करून नवे नियम समजून घ्यावेत
* क्रेडिट कार्ड विमा पॉलिसी वाचावी, पर्यायी विमा पर्याय शोधावेत
* 1 ऑगस्टच्या दरघट-बढीची माहिती प्रत्यक्ष घोषणा झाल्यावर तपासावी
1 ऑगस्टपासून लागू होणाऱ्या या बदलांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारने महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी काही उपाययोजना कराव्यात, अशी जनतेकडून मागणी होऊ लागली आहे.