
मुंबई प्रतिनिधी
राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. योजनेच्या लाभार्थी यादीत मोठ्या प्रमाणावर बोगस नावे आणि अपात्र महिलांचा समावेश असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, शासनाने तत्काळ पडताळणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमेमुळे आतापर्यंत हजारो महिलांची नावे यादीतून हटवण्यात आली आहेत.
योजनेचा उद्देश गरजू महिलांना दरमहा आर्थिक आधार देण्याचा असला, तरी काही सरकारी कर्मचाऱ्यांनी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलांनीही या योजनेत घुसखोरी केल्याचे उघड झाले आहे. यामुळे खऱ्या लाभार्थींवर अन्याय होण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
‘या’ अपात्र महिलांना यादीतून बाहेरचा रस्ता!
महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत लेखी उत्तराद्वारे माहिती दिली की, योजनेचा गैरफायदा घेतलेल्या २,२८९ महिलांना यादीतून वगळण्यात आले आहे, यामध्ये अनेक महिला सरकारी सेवेत कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शासनाच्या नियमानुसार, ज्या कुटुंबांकडे चारचाकी गाडी, बंगला, आणि अडीच लाख रुपयांहून अधिक उत्पन्न आहे, त्या लाभासाठी पात्र नाहीत.
तुमचे नाव यादीत आहे की नाही, हे तपासा घरबसल्या!
तुमचे नाव अजूनही लाभार्थी यादीत आहे की नाही, यासाठी खालील पद्धतीने तात्काळ तपासणी करा:
अधिकृत संकेतस्थळ: https://ladakibahin.maharashtra.gov.in
* आधार क्रमांक, नाव किंवा मोबाइल नंबर टाका
* काही सेकंदांत यादीत नाव आहे का ते कळेल
* “No Record Found” दिसल्यास तुमचे नाव वगळण्यात आले आहे
नाव चुकीने वगळले गेले असेल तर काय करावे?
जर तुम्ही योजनेसाठी पात्र असतानाही तुमचे नाव यादीतून वगळले गेले असेल, तर खालील ठिकाणी संपर्क करा:
* जवळचे लोकसेवा केंद्र / ग्रामपंचायत कार्यालय / अंगणवाडी केंद्र
* आधार कार्ड, बँक पासबुक, अर्ज क्रमांक (असल्यास), ई-केवायसी माहिती बरोबर ठेवा
खात्यात पैसे जमा झाले की नाही हे देखील तपासा!
* “नारी शक्ती दूत” अॅप डाउनलोड करा – गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध
* लॉगिन करा – मोबाइल नंबर व ओटीपी वापरून
* “लाडकी बहिण योजना” निवडा
* “मंजूर यादी” किंवा “अर्ज स्थिती” मध्ये तपासणी करा
ऑफलाइन पर्यायही उपलब्ध:
जवळच्या अंगणवाडी केंद्र, सेतू सुविधा केंद्र, किंवा महिला व बालकल्याण कार्यालयात जाऊन माहिती मिळवा.
यादी रोज अद्ययावत होत असल्याने, नियमितपणे अॅप किंवा पोर्टलवर लॉगिन करून स्थिती तपासणे आवश्यक आहे.
शासनाकडून योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी प्रयत्न सुरू असून, गरजू आणि पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा, यासाठी सखोल पडताळणी केली जात आहे.
आपले नाव अजूनही यादीत आहे का, हे आजच तपासा – अन्यथा लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे!