
घाटकोपर,प्रतिनिधी
पूर्व द्रुतगती मार्गावर घाटकोपरमध्ये क्रेन कोसळून भीषण अपघात झाला आहे. यात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. यामुळे ठाण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपरमधील पंत नगर परिसरात एक क्रेन कोसळली आहे. यामुळे घाटकोपरवरुन ठाण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच पूर्व द्रुतगती मार्गावर ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर ही क्रेन कोसळल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. या दुर्घटनेत एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. या अपघातामुळे सध्या घाटकोपरवरुन ठाण्याकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे.