
मुंबई प्रतिनिधी
देशातील महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. विशेषतः हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि व्यावसायिक वापरासाठी लागणाऱ्या १९ किलोच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत आजपासून (१ जुलै २०२५) मोठी घट करण्यात आली आहे. मात्र, घरगुती गॅस ग्राहकांना याचा लाभ मिळालेला नाही.
किती झाली कपात?
तेल विपणन कंपन्यांनी सकाळी जाहीर केलेल्या नव्या दरानुसार व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत ५७ ते ६० रुपयांची घट झाली आहे. दिल्लीमध्ये आता हा सिलेंडर १६६५ रुपयांना, तर कोलकातामध्ये १७६९ रुपयांना उपलब्ध आहे. मुंबईत ही किंमत आता १६१६ रुपये, तर चेन्नईमध्ये १८२३.५० रुपये इतकी झाली आहे.
घरगुती सिलेंडर मात्र जुन्याच दरात
महागाईने त्रस्त असलेल्या सामान्य नागरिकांसाठी मात्र कोणताही बदल झालेला नाही. दिल्ली, मुंबई, कोलकाता या शहरांतील १४ किलो घरगुती सिलेंडरच्या किमती तशाच कायम आहेत.
शहरघरगुती सिलेंडर किंमत (₹)दिल्ली 853.00 मुंबई 852.50कोलकाता876.00 (साधारण)लखनऊ890.50पाटणा942.50हैदराबाद905.00वाराणसी9
16.50गाजियाबाद850.50
उज्ज्वला योजनेचा थेट लाभ
सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत १० कोटी लाभार्थ्यांना दरमहा ३०० रुपयांची थेट सबसिडी देण्याची घोषणा केली आहे. यासाठी २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात ११,१०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे गरीब आणि गरजू महिलांना घरगुती सिलेंडर अधिक स्वस्त दरात मिळू शकतो.
थोडक्यात
व्यावसायिक गॅस सिलेंडर ₹६० पर्यंत स्वस्त
घरगुती सिलेंडरच्या किमतीत बदल नाही
उज्ज्वला योजनेचा लाभ सुरूच
सामान्य ग्राहकांना महागाईतून फारसा दिलासा नाही
गॅस स्वस्त, पण दिलासा अपुरा!
महागाईच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक सिलेंडर स्वस्त होणे सकारात्मक पाऊल असले, तरी सर्वसामान्य ग्राहकांच्या अपेक्षा मात्र अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत.