
मुंबई प्रतिनिधी
मुंबई | अहमदाबादमध्ये घडलेल्या भीषण विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट करत शिवसैनिकांसह चाहत्यांना भावनिक आवाहन केले आहे.
I have decided to not celebrate my birthday tomorrow, as earlier planned, with those wanting to meet and greet me personally.
Seeing today’s tragic events that have unfolded, my prayers, like everyone else’s are with the victims and their families.
I will humbly request…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 12, 2025
१३ जून रोजी आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आहे. या दिवशी ते शिवसैनिकांसोबत वाढदिवस साजरा करणार होते. मात्र, अहमदाबाद येथे घडलेल्या दुर्घटनेत अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याने आणि संपूर्ण देश हळहळत असताना, अशा परिस्थितीत वाढदिवस साजरा करणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
“मला भेटायला येणाऱ्या व्यक्तींसोबत उद्या मी माझा वाढदिवस साजरा करणार होतो. पण आज अहमदाबाद येथे झालेल्या दुर्घटनेनंतर मी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या संवेदना या दुर्घटनेतील पीडितांसोबत व त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. माझी सर्वांना विनंती आहे की जे कुणी उद्या माझ्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा द्यायला येणार होते त्यांनी येऊ नये. माझ्या विनंतीला मान द्यावा,” असे ट्विट करत आदित्य ठाकरे यांनी कळवले.